SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
साहेब .... एकच नंबर काम घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवडनागावमध्ये भीषण आगीचा तांडव! स्क्रॅप गोडाऊन जळून खाक; ३५ लाखांचे नुकसानसाहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा हे घटक उदरनिर्वाहासाठी उपयुक्त : कुलसचिव डॉ.विलास शिंदेएकात्मिक कर प्रणालीतून कर वसुलीला गती; नागरिकांना मिळणार सुलभ सेवामहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शनमंत्री बावनकुळे व रावल यांच्याकडून डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनइयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीरमुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहाला गालबोट : 'भुलेश्वरचा राजा'ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमीमराठीच्या जादूने 'जेन झी' घायाळ! पुण्यात राहुल गांधींचा हुकमी एक्का; म्हणाले, "पुणे म्हणजे..."

जाहिरात

 

घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवड

schedule23 Aug 26 person by visibility 100 categoryशैक्षणिक

  अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठातील 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील आय. एन. टी. आय आंतरराष्ट्रीय विद्यापीठात एक क्रेडिट एक्सचेंज कार्यक्रम 2026 साठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी नुकतेच यासाठी प्रस्थान केले.

  घोडावत विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि जागतिक स्तरावरील शैक्षणिक संधींच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून यामध्ये विविध विभागांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSE) विभागातील 8, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML) विभागातील 8, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS) विभागातील 11, बीबीए विभागातील 3 आणि बीसीए विभागातील 1 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

  या विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक अनुभव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अध्ययनाची संधी, विविध संस्कृतींचा परिचय तसेच व्यापक व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

    निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 100% शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून, त्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाच्या अटींनुसार निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक आणि सर्व संबंधितांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes