SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाईसार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जकोल्हापूर महानगरपालिका : वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडजनसेवेचा आदर्श! रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिक यांचा स्तुत्य उपक्रमवेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाला भेटकोल्हापूरकरांचे लाडके "यामिनी" प्रदर्शन सज्ज; रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघमल्हार हॉलमध्ये आयोजन!शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागूबारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरुस्वागत मंडपाच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासनाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध; आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची प्रतिक्रिया

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाई

schedule22 Sep 26 person by visibility 447 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्र.क्र.20 मध्ये उपायुक्त परितोष कंकाळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी आज सकाळी 11.00 वाजता सर्व कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरीची तपासणी केली. या तपासणीमध्ये कर्तव्यावर गैरहजर असलेल्या तसेच गणवेश न परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने आज 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी रु.५००/- प्रमाणे तर एका मुकादमावर रु.2000/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

  प्रभाग क्रमांक २० मध्ये दैनंदिनपणे रस्ते सफाई करणे, कचरा उठाव करणे असे अंत्यत महत्वाचे स्वच्छतेचे कामकाज सोपविलेले आहे. तसेच कामावर असताना नियमितपणे गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर असून वरिष्ठांच्या न्याय व रास्त आज्ञेचे जाणीवपुर्वक व हेतुपरस्पर उल्लघंन केलेबाबतची कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आल्या आहेत.

 शहरातील स्वच्छता राखणे हे महानगरपालिका प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्याचे काम आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे आवश्यक असून या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा कर्तव्यचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असे उप-आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक शिस्त व कार्यक्षमता आणण्यासाठी अशा प्रकारच्या आकस्मिक हजेरी तपासण्या यापुढेही नियमितपणे करण्यात येणार आहेत. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes