SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाईसार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जकोल्हापूर महानगरपालिका : वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडजनसेवेचा आदर्श! रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिक यांचा स्तुत्य उपक्रमवेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाला भेटकोल्हापूरकरांचे लाडके "यामिनी" प्रदर्शन सज्ज; रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघमल्हार हॉलमध्ये आयोजन!शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागूबारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरुस्वागत मंडपाच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासनाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध; आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची प्रतिक्रिया

जाहिरात

 

सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज

schedule22 Sep 26 person by visibility 174 categoryमहानगरपालिका

◼️विसर्जन मार्गावर बॅरिकेट्स, वॉच टॉवर, सीसीटीव्ही व विद्युत व्यवस्था; सुमारे ३ हजार कर्मचारी नियुक्त

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेट्स उभारून सूचना फलक लावण्यात येणार असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा इमारतींमध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

  सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवर युद्धपातळीवर डांबरी पॅचवर्क पूर्ण करण्यात आले आहे. इराणी खण तसेच विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या मिरवणूक मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स, वॉच टॉवर तसेच प्रकाश व्यवस्थेची सुविधा करण्यात आली आहे.

   मिरवणूक मार्गावरील झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात आली असून, मार्गातील अडथळे व अतिक्रमणे दूर करण्याचे काम सुरू आहे. याबाबत आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व महापालिकेच्या उपशहर अभियंत्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स, वॉच टॉवर तसेच विविध पक्ष, संस्था व मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

◼️इराणी खणीवर चार क्रेन, १० फ्लोटिंग तराफे
 सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीवर चार क्रेन व १० फ्लोटिंग तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या कामकाजासाठी पवडी, आरोग्य, उद्यान तसेच इतर विभागांतील सुमारे ३ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच १०० टेंपो, ४०० हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर, ४ पाणी टँकर, २ बूम, ६ ॲम्बुलन्स तसेच आवश्यक इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळांवर स्वच्छता राखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून, वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. गणेशमूर्ती तसेच निर्माल्य संकलित करून ते इराणी खणीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

◼️विसर्जन मिरवणुकीतील मंडळांचे महापालिकेच्यावतीने श्रीफळ देऊन स्वागत
 शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांचे महापालिकेच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात येणार असून पर्यायी विसर्जन मार्गावरील हॉकी स्टेडियम येथेही स्वागत कक्षाची व्यवस्था करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी सहभागी मंडळांच्या अध्यक्षांना महापालिकेच्यावतीने श्रीफळ, पान-सुपारी तसेच एक रोप देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

            अग्निशमन विभागामार्फत विसर्जन स्थळी अग्निशमन दलाचे पथक तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने विसर्जन मिरवणूक पार पाडावी तसेच पर्यावरण पूरक गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्येच करावे असे आवाहन महापौर  रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes