गोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!
schedule22 Sep 26 person by visibility 362 categoryउद्योग
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी तब्बल ८२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे गोकुळच्या २५ जागांसाठी आता एकूण ३०१ उमेदवारांचे ३०१ अर्ज दाखल झाले आहेत.
या निवडणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गज उतरले असून, यामध्ये प्रामुख्याने आजी-माजी आमदार, माजी संचालक, मंत्रीपुत्र, आमदारपुत्र तसेच जिल्हा परिषदेच्या आजी-माजी सदस्यांचा समावेश आहे.
शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये अरुण इंगवले, रामभाऊ डांगे, बाबूराव रानगे, ॲड. दत्तात्रय राणे, मकरंद बोराडे, सुनील शिंद्रे, सतीश पाटील, धीरज डोंगळे, मुरलीधर जाधव, अभिषेक डोंगळे, दिलीप पाटील यांच्यासह इतर अनेक उमेदवारांचा समावेश आहे.
आता येत्या २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उमेदवारी अर्जांच्या छाननीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या छाननीमध्ये नेमकी कोणाकोणाचे अर्ज बाद होणार? याबद्दल ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरू झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.