SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देशकोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!

जाहिरात

 

जनसेवेचा आदर्श! रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिक यांचा स्तुत्य उपक्रम

schedule22 Sep 26 person by visibility 362 categoryराज्य

कोल्हापूर  :  भारतीय जनता पार्टी हा संस्कृती असणारा पक्ष आहे. या संस्कृतीचे पालन करणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. देव, देश आणि धर्म पालन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महागणपतीच्या मंडपात गरजू  कुटूंबियांना तेल, कडधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते महागणपतीची आरती संपन्न झाली.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी तरूण मंडळाच्या महागणपतीचे रांगेत उभे राहून दर्शन घेतले. त्यानंतर कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते महागणपतीची आरती झाली. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना महाडिक यांनी केली. त्यानंतर त्यांनी, मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे, ट्रस्टी गणेश वळंजू, अमित पाटील, राकेश वडणगेकर, नितीन पाटील, सागर पोवार, अमर कोठावळे, अँड. प्रताप जाधव यांच्याकडून मंडळाच्या सामाजिक कार्याची आणि विविध उपक्रमांविषयी माहिती घेतली. 

दरम्यान महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक प्रमोद देसाई, रिंंकू देसाई, सुनील वाडकर, नगरसेविका माधुरी नकाते, किरण नकाते, करण जाधव, अभय तेंडुलकर, पाचगावचे महेश पाटील यांच्या हस्ते गरजूंना तेल, कडधान्य, अशा विविध प्रकारच्या धान्याचे वाटप केले.  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले असून, त्याचाच एक भाग म्हणून आपण गरजूंना धान्य वाटप उपक्रम घेतला. त्यामध्ये नगरसेवक आणि युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी सहाय्य केल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.

 महागणपतीच्या आशिर्वादातूनच आपण हा उपक्रम राबवल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि शिवाजी चौक तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes