SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देशकोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!

जाहिरात

 

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू

schedule22 Sep 26 person by visibility 253 categoryराज्य

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटद्वारे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुषंगाने पुणे विभागातील संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर  रोजी प्रसिद्ध होणार असून, नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून, मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.


निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता नियमावलीचे काटेकोर पालन होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes