SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाईसार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जकोल्हापूर महानगरपालिका : वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडजनसेवेचा आदर्श! रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिक यांचा स्तुत्य उपक्रमवेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाला भेटकोल्हापूरकरांचे लाडके "यामिनी" प्रदर्शन सज्ज; रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघमल्हार हॉलमध्ये आयोजन!शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागूबारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरुस्वागत मंडपाच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासनाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध; आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची प्रतिक्रिया

जाहिरात

 

बारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु

schedule22 Sep 26 person by visibility 176 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी  ते मंगळवार, १६ मार्च २०२७ या कालावधीत, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी ते गुरुवार, ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, २० जानेवारी ते शनिवार, ६ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

 दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी  ते शनिवार, दि. १३ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येतील.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes