‘आत्मा’तर्फे सोमवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन
schedule25 Sep 26 person by visibility 133 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूरच्या कृषी संस्कृतीला आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना उजाळा देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माच्यावतीने सोमवार, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत व्ही. टी. पाटील सभागृह, जिल्ह्यातील 100 हून अधिक महिला या महोत्सवातील पाककला स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात भाकरी आणि रानभाज्यांपासून बनवलेले खास पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या महोत्सवात करटोली, अंबुशी, घोळ, आळू , काटेमाट, कुर्डू , पाथरी, टाकळी, बाबू कोंब, दिंडा इत्यादी 30 प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
या महोत्सवात 25 पेक्षा अधिक प्रजातींच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामुळे तरुण पिढीला रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः महिला, विद्यार्थी आणि खाद्यप्रेमींनी या अनोख्या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रानभाज्यांचे महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले .