SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर तालुक्यातील दोन देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; ४.४३ कोटींचा निधी; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश​"आम्ही सगळे जुळे भाऊ!"; गोकुळ निवडणुकीत महायुतीचे विरोधकांना जोरदार आव्हानमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावारणा विद्यापीठाचा महारोजगार मेळावा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललासार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जगोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्टजैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे : संतोष मोरेमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणीशेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जाहिरात

 

​"आम्ही सगळे जुळे भाऊ!"; गोकुळ निवडणुकीत महायुतीचे विरोधकांना जोरदार आव्हान

schedule24 Sep 26 person by visibility 173 categoryउद्योग

कोल्हापूर: गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीकडे तब्बल ४,४०० ठराव असल्याचे समोर आले असून, जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. "महायुतीत कोणीही लहान किंवा मोठा नाही, आम्ही सगळे जुळे भाऊ आहोत," असा स्पष्ट संदेश देत महायुतीची निवडणूक बिनविरोध होणार नसली, तरी मतदार महायुतीलाच भरभरून साथ देतील, असा ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.

बैठकीतील  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 शुक्रवारी श्री अंबाबाई मंदिराच्या पावन परिसरातून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.  'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' असे महायुतीच्या पॅनेलचे नाव असणार आहे.

 महायुतीमध्ये कोणतेही मतभेद किंवा मनभेद नसून, सर्व घटक पक्ष एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अवसायानातील सुमारे १,३२० संस्थांची नाराजी दूर करून त्यांनाही सोबत घेतले जाईल, तसेच विरोधकांनी निवडणूक लढवण्यापेक्षा शांत बसावे, असा सल्ला यावेळी देण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes