SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समाज माध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी 'सत्य' जनतेपर्यंत पोहोचवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मावारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधीस्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापूर जिल्ह्यात 11 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागू‘आत्मा’तर्फे सोमवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजनकोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बाप्पाची मूर्ती कोसळली!जागतिक औषधविक्रेते दिन: आरोग्य व्यवस्थेचा कणाकरवीर तालुक्यातील दोन देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; ४.४३ कोटींचा निधी; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश​"आम्ही सगळे जुळे भाऊ!"; गोकुळ निवडणुकीत महायुतीचे विरोधकांना जोरदार आव्हानमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करा

जाहिरात

 

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 जयंतीनिमित्त अभिवादन

schedule25 Sep 26 person by visibility 162 categoryसामाजिक


कोल्हापूर : मराठा आरक्षण चळवळीचे जनक,मराठा महासंघाचे संस्थापक नेते तसेच माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ येथे माहिती अधिकारी फारुक बागवान यांच्या हस्ते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व महामंडळाच्या लाभार्थ्यांनी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

स्व. अण्णासाहेब पाटील यांनी समाजातील युवकांना उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा दिली. समाजातील युवकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील युवकांच्या उद्योजकतेला चालना देण्याचे कार्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक, कामगार आणि उद्योजकीय कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले. समाजातील युवकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वावलंबी व उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महामंडळाचे लाभार्थी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes