कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बाप्पाची मूर्ती कोसळली!
schedule25 Sep 26 person by visibility 1249 categoryसामाजिक
कोल्हापूर: कोल्हापुरातून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये एक अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास गोखले कॉलेज चौकात वाय. पी. पोवार नगर मंडळाची २१ फूट उंच भव्य गणेश मूर्ती अचानक रस्त्यावर कोसळली.
मिरवणूक मार्गावरील धोकादायक विद्युत तारा हटवण्यासाठी मंडळाने महावितरणकडे वारंवार विनंती करूनही प्रशासनाने डोळे झाक केली, परिणामी मूर्तीला तारेचा स्पर्श होऊन हा अपघात झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीतून नेण्यात येणारी ही २१ फुटी महाकाय मूर्ती एका पायावर आणि झुकलेल्या अवस्थेत होती. ती कोसळल्यानंतर काही क्षणांसाठी परिसरात एकच सन्नाटा पसरला होता; मात्र सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, तर कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने मूर्ती बाजूला केली.