SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समाज माध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी 'सत्य' जनतेपर्यंत पोहोचवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मावारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधीस्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापूर जिल्ह्यात 11 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागू‘आत्मा’तर्फे सोमवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजनकोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बाप्पाची मूर्ती कोसळली!जागतिक औषधविक्रेते दिन: आरोग्य व्यवस्थेचा कणाकरवीर तालुक्यातील दोन देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; ४.४३ कोटींचा निधी; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश​"आम्ही सगळे जुळे भाऊ!"; गोकुळ निवडणुकीत महायुतीचे विरोधकांना जोरदार आव्हानमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करा

जाहिरात

 

वारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधी

schedule25 Sep 26 person by visibility 185 categoryशैक्षणिक

वारणानगर : वारणा विद्यापीठांतर्गत कार्यरत वारणा स्कूल ऑफ लॉ मधील ५ वर्षे व ३ वर्षे विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रियेच्या संस्थात्मक फेरीकरिता विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी व विकल्प अर्ज भरण्याची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे.

राज्य सीईटी सेलअंतर्गत ५ वर्षे व ३ वर्षे विधी अभ्यासक्रमांची केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया सुरू असून तिसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया २४ सप्टेंबर २०२६ रोजी पूर्ण झाली आहे. संस्थात्मक फेरीसाठी उमेदवारांना संबंधित महाविद्यालय अथवा विद्यापीठाचा विकल्प अर्ज भरणे बंधनकारक आहे. यासाठी नवीन अर्ज करणारे तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय फेरीत प्रवेश न मिळालेले उमेदवार पात्र आहेत.

५ वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी २६ ते २८ सप्टेंबर २०२६, तर ३ वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी २७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील संपादन व विकल्प अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येणार आहे.

वारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत नवीन नोंदणी करून वारणा विद्यापीठाचा विकल्प अर्ज भरावा, असे आवाहन वारणा स्कूल ऑफ लॉच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या केंद्रीयभूत पद्धतीनुसार होणार असून मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes