SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समाज माध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी 'सत्य' जनतेपर्यंत पोहोचवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मावारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधीस्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापूर जिल्ह्यात 11 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागू‘आत्मा’तर्फे सोमवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजनकोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटी बाप्पाची मूर्ती कोसळली!जागतिक औषधविक्रेते दिन: आरोग्य व्यवस्थेचा कणाकरवीर तालुक्यातील दोन देवालयांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; ४.४३ कोटींचा निधी; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश​"आम्ही सगळे जुळे भाऊ!"; गोकुळ निवडणुकीत महायुतीचे विरोधकांना जोरदार आव्हानमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करा

जाहिरात

 

समाज माध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी 'सत्य' जनतेपर्यंत पोहोचवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

schedule25 Sep 26 person by visibility 104 categoryशैक्षणिक

◼️ छत्तीसगड व बिहारच्या पत्रकारांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : आज टेलिव्हिजन, डिजिटल व समाज माध्यमे आली असली तरी देखील वृत्तपत्रांची विश्वसनीयता अधिक आहे. रेडिओ आल्यानंतर दूरचित्रवाणी येण्यास मोठा कालावधी गेला. परंतु अलीकडे नवनवी माध्यमे झपाट्याने येत आहेत.  समाज माध्यमांमध्ये आज असत्य व अर्धसत्य माहितीचा महापूर आला आहे. या पुरातून 'सत्य' वेगळे करून ते जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्रकारांना केले. 

भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसेच बिहार राज्यातील पत्रकार व माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा, छत्तीसगड व बिहार येथील विविध माध्यम समूहांचे पत्रकार व प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पत्रकारिता हा लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ आहे असे सांगून क्षेत्रीय भेटी दिल्याने पत्रकारांना एखाद्या विषयाचे समग्र आकलन होण्यास मदत होते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. पत्रकार हे शासन व समाजात सेतूचे कार्य करीत असतात. 'स्तंभ' हा नेहमी सरळ व मजबूत असला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

वृत्तांकन करीत असतानाच  पत्रकारांनी नशामुक्त भारत अभियान, टीबीमुक्त भारत मोहीम आदी कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीचे काम करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.   

शासन योजना तयार करते व त्यांची अंमलबजावणी करते. या योजनांबाबत जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी करावे असे राज्यपालांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes