SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घरफाळा थकबाकीदारांच्या 2 व्यावसायिक आस्थापना सीलक्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीकेडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा; कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ ॲम्बेसेडर’मध्ये स्थानइचलकरंजीत कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा; शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण!शिक्षक मतदारसंघ निवडणूक: प्रफुल्ल तावरे यांचा जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबासुसंस्कृत समाज निर्मितीसाठी साहित्य महत्वाचे : डाॅ. हूबनाथ पांडेयमंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन!पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचारपोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

जाहिरात

 

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक: सोलापुरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा धडाका

schedule21 Oct 26 person by visibility 374 categoryराजकीय

सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, सोलापूर जिल्ह्यात शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला आहे. पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरनंतर आता गावडे यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा पिंजून काढत प्रचाराचा झंझावात निर्माण केला असून पंढरपूरपासून माळशिरसपर्यंत विविध गाठीभेटी, संवाद आणि प्रचार सभांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी तीव्र केली आहे.

या प्रचारादरम्यान त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रणवजी परिचारक, सांगोल्यात माजी आमदार दीपक आबासाहेब साळुंखे, आमदार बाबासाहेब देशमुख, तसेच आमदार सुभाष बापू देशमुख आणि आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबा मिळवला आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णीत महायुतीच्या प्रचार बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

याशिवाय श्रीराम विद्यालय, आसावा दयानंद हायस्कूल, निवडूनटेश्वर हायस्कूल, बार्शीचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि माळशिरसमधील श्रीराम शिक्षण संस्था व मॉडेल विविधारांग शाळा व महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी संवाद साधला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या पाठिंब्याची पुष्टी मिळाली असून रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व मतदारांशी संवाद साधला जात आहे. 

श्री १०८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद आणि ब्रह्म होटकी महाराज शैक्षणिक संकुलाकडूनही पाठिंबा मिळाला असून माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत महायुतीची प्रचार सभा उत्साहात पार पडली. नेत्यांच्या भेटी, विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा आणि जिल्हाभरात झालेला थेट संपर्क यामुळे सोलापूरच्या राजकीय मैदानात वाढलेली ही धावपळ शिक्षक मतदारांच्या कौलासाठी किती निर्णायक ठरणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes