SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाबाबत १६ व १७ एप्रिलला सुनावणीकामाचा दर्जा अन् वेळेची मर्यादा; महामार्गाच्या कामाबाबत खासदार धनंजय महाडिक आक्रमक१३ केंद्रांवर शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न ; ७ हजार ३१ विद्यार्थ्यांचा सहभागशिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले; बॉटेनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ फूल पाहण्याची निसर्गप्रेमींना संधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजितपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करावेतसामाजिक समता सप्ताह निमित्त विवेकानंद महाविद्यालयात व्याख्यान संपन्नमाणूस म्हणून मान्यतेसाठीच बाबासाहेबांकडून धम्मस्वीकार: प्रा. सुकुमार कांबळे डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांचे हॉफ विद्यापीठ जर्मनी येथे गुणवत्तापूर्ण कामगिरी​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जल धोरण आणि जलसंपत्ती दिन​

जाहिरात

 

अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाबाबत १६ व १७ एप्रिलला सुनावणी

schedule10 Apr 26 person by visibility 78 categoryराज्य

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी गठीत समितीसमोर आपली भूमिका किंवा मते मांडण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी १५ एप्रिल २०२६ पर्यंत dg-sw@barti.in या ई-मेल आयडीवर आपले निवेदन किंवा अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.

या संदर्भात, न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय, पाटणा) यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने आपल्या शिफारशींसह अहवाल १६ मार्च २०२६ रोजी शासनास सादर केला आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कार्यवाहीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या समितीसमोर आपली भूमिका किंवा मते मांडण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी १५ एप्रिल २०२६ पर्यंत dg-sw@barti.in या ई-मेल आयडीवर आपले निवेदन किंवा अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करताना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

सुनावणीचे ठिकाण, वेळ व इतर तपशील संबंधितांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes