SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाबाबत १६ व १७ एप्रिलला सुनावणीकामाचा दर्जा अन् वेळेची मर्यादा; महामार्गाच्या कामाबाबत खासदार धनंजय महाडिक आक्रमक१३ केंद्रांवर शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न ; ७ हजार ३१ विद्यार्थ्यांचा सहभागशिवाजी विद्यापीठात ‘सुरण’ फुलले; बॉटेनिकल गार्डनमध्ये दुर्मिळ फूल पाहण्याची निसर्गप्रेमींना संधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजितपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करावेतसामाजिक समता सप्ताह निमित्त विवेकानंद महाविद्यालयात व्याख्यान संपन्नमाणूस म्हणून मान्यतेसाठीच बाबासाहेबांकडून धम्मस्वीकार: प्रा. सुकुमार कांबळे डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांचे हॉफ विद्यापीठ जर्मनी येथे गुणवत्तापूर्ण कामगिरी​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जल धोरण आणि जलसंपत्ती दिन​

जाहिरात

 

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करावेत

schedule10 Apr 26 person by visibility 95 categoryराज्य

कोल्हापूर : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे. ही योजना विशेषतः सध्या कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या बेरोजगार युवकांसाठी असून त्यांना रोजगाराच्या योग्य संधी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार आहे. यासोबतच प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पात केली होती. 10 वी,  12 वी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर उमेदवारांनी इंटर्नशिपसाठी PM Internship Portal वर नोंदणी करून अर्ज करावा. उमेदवारांनी पोर्टलवर स्वतःचे प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार असून अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे.
योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित कंपनीकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षणही उपलब्ध करून दिले जाणार आहे.


अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय निवासस्थान सी बिल्डिंग, विचारे माळ, कोल्हापूर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४५६७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes