SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वाभिमानीचा महामार्गावर एल्गार: ऊस दराची कोंडी कायम; विनाकपात ₹४,२०० च्या मागणीसाठी उद्या ६ नोव्हेंबरला कोल्हापूर, सांगली, सातारा 'जिल्हा बंद'चा इशारामहापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 19 नागरिकांचे अर्ज दाखलऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथनउपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार याच आमच्या नेत्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणगोकुळ'मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर माजी सरन्यायाधीशांनी दिला होता कायदेशीर सल्लागोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!गोकुळ दूध संघाचा ‘डेडलॉक’ दूर करण्यासाठीच सरकारची कारवाई: मंत्री हसन मुश्रीफ‘गोकुळ’ मध्येू वसुबारस निमित्त- म्हैस व गाय-वासराचे पूजन गोकुळसाठी कोल्हापूरकरांचा एल्गार! ९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघातगोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार: आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन

schedule05 Nov 26 person by visibility 155 categoryराज्य

◼️डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद
मिड स्वीडन विद्यापीठासोबत संयुक्त उपक्रम 

कोल्हापूर : जागतिक स्तरावर संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि मिड स्वीडन युनिव्हर्सिटी, स्वीडन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘बायलॅटरल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन फंक्शनल मटेरियल्स फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज’ ही आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. 

‘फंक्शनल मटेरियल्स टू अ सस्टेनेबल फ्युचर’ या संकल्पनेवर या परिषदेमध्ये प्रगत कार्यात्मक पदार्थ, जैवसाहित्य व ऊती अभियांत्रिकी, ऊर्जा साठवण व रूपांतरण, पर्यावरणपूरक उपाययोजना, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक पदार्थ अशा महत्त्वपूर्ण संशोधन क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली.

मिड स्वीडन युनिव्हर्सिटीचे इनोव्हेशन अँड बिझनेस को-ऑपरेशनचे उपकुलगुरू प्रा. हान्स-एरिक निल्सन आणि  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी दोन्ही विद्यापीठांतील १२ संशोधक व प्राध्यापकांनी आपापल्या संस्थांमधील संशोधन कार्याची माहिती सादर केली.

परिषदेच्या पहिल्या सत्रात ऊर्जा साठवण आणि ऊर्जा रूपांतरण उपकरणांसाठी आवश्यक प्रगत पदार्थांवर चर्चा झाली. यामध्ये प्रा. उमाकांत पाटील यांनी ऊर्जा साठवण व रूपांतरणासाठी बाइंडर-फ्री थिन फिल्म इलेक्ट्रोड्स या विषयावर, तर प्रा. जोनास ऑर्टेग्रेन यांनी बॅटरीसाठी नॅनोमटेरियल्स या विषयावर संशोधन सादर केले. डॉ. विजय कुंभार यांनी ऊर्जा साठवण अनुप्रयोगांसाठी मेटल ऑक्साइड हेटरोस्ट्रक्चर्स, प्रा. रेयुन झांग यांनी स्मार्ट सेन्सिंग व ऊर्जा संकलनासाठी सॉलिड-स्टेट उपकरणे, तर डॉ. प्रवीण पवार यांनी फोटॉनिक्स आणि जैववैद्यकीय अनुप्रयोगांसाठी फंक्शनल ग्लासेस या विषयांवर व्याख्याने दिली. 

दुसऱ्या सत्रात जैवसाहित्याच्या आधुनिक उपयोगांवर विशेष भर देण्यात आला. प्रा. मॅग्नस नॉरग्रेन यांनी सेल्युलोजचे विविध उपयोग, असोसिएट प्रोफेसर क्रिस्टीना डाहलस्ट्रॉम यांनी सेल्युलोज-आधारित ट्रायबोइलेक्ट्रिक मटेरियल्स, तर डॉ. शिवाजी काष्टे यांनी टिश्यू इंजिनिअरिंगसाठी जैवसाहित्य या विषयावर संशोधन मांडले. प्रा. मनीषा फडतरे यांनी पुढील पिढीतील तंत्रज्ञानासाठी शाश्वत पदार्थ, तर प्रा. अर्पिता तिवारी यांनी बायोसेन्सिंगसाठी बायोफंक्शनलाइज्ड मटेरियल्स या विषयांवर सादरीकरण केले.

या परिषदेचे संयोजक म्हणून प्रा. उमाकांत पाटील आणि प्रा. मनीषा फडतरे यांनी काम पाहिले. परिषदेमध्ये दोन्ही विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. परिषदेचा समारोप डॉ. प्रा. प्रमोद एस. पाटील आणि असोसिएट प्रोफेसर जोनास ऑर्टेग्रेन यांच्या समारोपपर मनोगताने झाला.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार  सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes