SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वाभिमानीचा महामार्गावर एल्गार: ऊस दराची कोंडी कायम; विनाकपात ₹४,२०० च्या मागणीसाठी उद्या ६ नोव्हेंबरला कोल्हापूर, सांगली, सातारा 'जिल्हा बंद'चा इशारामहापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 19 नागरिकांचे अर्ज दाखलऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथनउपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार याच आमच्या नेत्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणगोकुळ'मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर माजी सरन्यायाधीशांनी दिला होता कायदेशीर सल्लागोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!गोकुळ दूध संघाचा ‘डेडलॉक’ दूर करण्यासाठीच सरकारची कारवाई: मंत्री हसन मुश्रीफ‘गोकुळ’ मध्येू वसुबारस निमित्त- म्हैस व गाय-वासराचे पूजन गोकुळसाठी कोल्हापूरकरांचा एल्गार! ९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघातगोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार: आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार याच आमच्या नेत्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

schedule05 Nov 26 person by visibility 152 categoryराज्य

◼️त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करू; येणाऱ्या सर्व निवडणुकीत पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली घौडदौड करेल
                      
मुंबई : उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार याच आमच्या नेत्या आहेत, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करू; येणाऱ्या सर्व निवडणुकीत पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली घौडदौड करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
        
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ बोलत होते.
         
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली, त्या बैठकीत नेमकं काय झालं? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना सोडून राष्ट्रवादी शरद पवार  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाणार आहे काय? या प्रश्नावर ते म्हणाले, तसं काही अजिबात नाही. उपमुख्यमंत्री नामदार श्रीमती सुनेत्रा पवारवहिनी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी आमच्या चर्चा झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखालीच येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही काय घमासान करणार आहोत ते तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. तसेच; राज्याचे अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावे या संदर्भातही चर्चा झाली. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यू संदर्भात तुम्ही सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समजते, या प्रश्नावर  मुश्रीफ म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीतसुद्धा आम्ही हा मुद्दा उपस्थित केलेला होता. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाताचा अहवाल ताबडतोब आला पाहिजे आणि जनतेला याचे उत्तर ताबडतोब मिळाले पाहिजे, या आग्रही मागणीसह आम्ही दिवाळीनंतर आम्ही सर्व प्रमुख नेते, सर्व मंत्री आणि सर्व आमदार मुख्यमंत्री  देवेंद् फडणवीस यांची भेट घेणार आहोत. या तपासाची नेमकी दिशा काय आहे आणि नेमकं काय निष्पन्न झाले आहे याबाबतही विचारणा करणार आहोत.

 या दुर्दैवी अपघाताच्या सीबीआय तपास तपासाच्या मागणीवर आम्ही कायम ठाम आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांशी या मागणी याबाबतही चर्चा करणार आहोत.
​          
शरद पवार यांच्यावर उपचार सुरू असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले,  शरद पवार हे माझे नेते होते, ते आमचे दैवत आहेत. त्यांची प्रकृती सुधारून त्यांना आराम मिळावा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. या वयातही ते जनतेसाठी कार्यरत आहेत, याचा आम्हा सर्वांनाच आनंद, समाधान आणि गर्वही आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes