महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 19 नागरिकांचे अर्ज दाखल
schedule05 Nov 26 person by visibility 163 categoryमहानगरपालिका
◼️प्राप्त तक्रारी तातडीने निर्गत करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येतो. याअंतर्गत आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात "जनता दरबार" आयोजित करण्यात आला. यावेळी 19 नागरिकांनी विविध समस्या व मागण्यांबाबत अर्ज दाखल केले.
महापौर रुपाराणी निकम यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या व तक्रारी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
जनता दरबाराच्या प्रारंभी महापौर रुपाराणी निकम यांनी नागरिकांना आपल्या समस्या थोडक्यात व स्पष्टपणे मांडण्याच्या सूचना केल्या. यावेळी विविध विभागांशी संबंधित एकूण 19 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये, नगररचना विभाग – 4, विभागीय कार्यालय क्र. 1 – 2, विभागीय कार्यालय क्र.2 – 1, विभागीय कार्यालय क्र.4 – 1, पाणीपुरवठा विभाग – 1, उद्यान विभाग – 2, इस्टेट विभाग – 1, अतिक्रमण विभाग – 4, मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालय – 2, आणि पेन्शन विभागास - 1 अशा अर्जांचा समावेश आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, आरोग्य विशेष समिती उपसभापती वैभव माने, नगरसेवक विजयसिंह देसाई, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता जयेश जाधव, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव दिवाकर कारंडे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मिलिंद जाधव, अरुणकुमार गवळी, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सहाय्यक अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.