SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कृषी निविष्ठा विक्री व्यावसायिकांचा संप मागेशासकीय निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश सुरूकोल्हापूर: ५० हजारांची लाच घेताना खासगी इसमासह पोलीस हेड कॉन्स्टेबल जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाईकोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवलेकोल्हापुरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून अंमलबजावणीघरफाळा वसुलीसाठी विशेष मोहिम राबवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड1 मे रोजी ‘असाक्षर मुक्त गाव’ शपथ उपक्रमकळे बाजारपेठेतील रस्ता 31 मेपर्यंत बंदजिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवडरगेडियन फिटनेस क्लब आणि कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरास प्रतिसाद

जाहिरात

 

शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश सुरू

schedule28 Apr 26 person by visibility 139 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राधानगरी, गगनबावडा, शिरोळ व मसूदमाले ता. पन्हाळा येथील एकूण 4 शासकीय निवासी शाळांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 6 वी ते 10 वी करिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाते. तसेच अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम, ई-लायब्ररी, स्वतंत्र प्रयोगशाळा, संगणक कक्ष, क्रीडा साहित्य, जिम, वॉशिंग मशीन व CCTV निगराणीतील सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाते. इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ॲकॉस्टिक क्लासरूम व अभ्यासिकेची सोय आहे.

प्रवेशासाठी आरक्षणानुसार अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त जाती-भटक्या जमाती 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के व विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येत असून इच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रहिवासी दाखला, मागील शाळेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड या कागदपत्रांसह संबंधित निवासी शाळेचे मुख्याध्यापक किंवा गृहपाल यांच्याकडे अर्ज सादर करावा. विद्यार्थ्याकडे स्वतःचा जातीचा दाखला नसल्यास वडील, भाऊ किंवा बहिणीचा दाखला ग्राह्य धरला जाईल.

जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जास्तीत जास्त पात्र व होतकरू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित निवासी शाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र. 0231-2651318 याव्दारे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes