कोल्हापुरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून अंमलबजावणी
schedule28 Apr 26 person by visibility 157 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, एल निनोच्या व आय.ओ.डी.च्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार असल्याने व पर्जन्यमानामध्ये घट होणार असलेने धरणातील उपलब्ध पाणी साठयाचा पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. परिणामी, काळम्मावाडी व शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणे आवश्यक झाले आहे. उपलब्ध पाणी साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिकेने शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, दि. ३० एप्रिल २०२६ पासून शहरातील विविध भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
ए व बी वॉर्ड तसेच सलग्नीत भाग :
दिनांक 30 एप्रिल 2026 पासून पुढे एक दिवस आड पुईखडी जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकर नगर, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपिंग परिसर, शेंडापार्क टाकी परिसर, जवाहर नगर, वाय. पी. पोवार नगर, मिरजकर तिकटी आदी भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा होईल.
ई वॉर्ड व सलग्नीत भाग :
दिनांक 30 एप्रिल 2026 पासून पुढे एक दिवस आड कसबा जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, कसबा बावडा, रमणमळा, नागाळा पार्क, लाईन बाजार, हिम्मतबहाद्दुर, जाधववाडी, कारंडे मळा, ताराराणी पुतळा, न्यू शाहूपुरी, बसंत बहार टॉकीज परिसर, कलेक्टर कार्यालय, न्यू पॅलेस, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, महाडीक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी (१ ते १३ वी गल्ली), मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीन पार्क, शाहूपुरी (१ ते ४ थी गल्ली), व्यापार पेठ आदी भागांचा समावेश आहे.
सी व डी वॉर्ड (दि. १ मे २०२६ पासून) :
दिनांक 1 मे 2026 पासून पुढे एक दिवस आड चंबुखडी जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी ५ ते ८ वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, कुंभार गल्ली, भवानी मंडप, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रम्हेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, फुलेवाडी, रंकाळा टॉवर परिसर, शिवाजीपेठ (काही भाग), गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी आदी भागांचा समावेश आहे.
तरी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.