डीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२५ अंतर्गत गड किल्ल्यांचे सादरीकरण
schedule29 Aug 25 person by visibility 110 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईमध्ये नेहमीच समाजउपयोगी विषयावर प्राधान्य दिले जाते याचाच भाग म्हणून डीकेटीईच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत यावेळी युनेस्को यांनी जागतिक वारसा स्थळ जाहिर केलेल्या १२ किल्ल्यांवर अधारित सजावट व श्रीं ची मूर्ती साकरण्यात आली आहे. युनेस्कोच्या यादीत सध्या भारतातील ४२ वारसा स्थळांचा समावेश आहे आणि युनेस्कोने नुकतेच जाहीर केलेल्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे याचेच सादरीकरण यावेळीच्या गणेशोत्सावामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी दरबार हॉल मध्ये केलेले आहे.
जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या हे सर्व किल्ले १७ व्या शतकात बांधले गलेले आहे हे किल्ले मराठा सैन्याच्या लष्करी व्यवस्थेचा आणि तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत याची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या गणेशोत्सामध्ये साकारलेली आहे यामुळे महाराष्ट्रातील संस्कृतीचे महत्वाचे वर्णन करण्यात आले आहे. याशिवाय श्रीं ची मूर्तीची प्रतिष्ठापनेची आरास मेगडंबरीमध्ये करण्यात आली आहे.
सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, ट्रेझरर पी.डी. दत्तवाडे ट्रस्टी डॉ ए.बी. सौंदत्तीकर, स्वानंद कुलकर्णी, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे व मागदर्शकांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस संस्थेचे डायरेक्टर प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचेसह सर्व विभागप्रमुख यांचे मागदर्शन लाभले तर विद्यार्थी प्रतिनिधी कमल शर्मा, किरण नाईक, आयुष पाचोरे, रमा कांबळे, जान्हवी पाटील, यश चौगुले, अभिषेक पाटील, प्रणिता दरुरे, आयुष पाटील यांनी सदर देखावा साकरण्यास परिश्रम घेतले.