माजी सैनिक संपर्क मेळाव्याचे बेळगावात आयोजन
schedule29 Aug 25 person by visibility 87 categoryराज्य

कोल्हापूर : मराठा लाईट रेजिमेंट यांच्याव्दारे माजी सैनिक संपर्क मेळावा (OUTREACH PROGRAMME FOR ESM) (संपर्क अभियान) दिनांक 19 ऑक्टोबर 2025 (रविवार) रोजी सकाळी 8.30 ते 4 या वेळेत शिवाजी मैदान, मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर, बेळगावी येथे आयोजित केला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील मराठा लाईट रेजिमेंटमधुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत यांना सैन्यातील, सुविधा, नवीन धोरणे व त्याबाबतच्या येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
मेळाव्यास येताना आधार कार्ड, स्वतःचा मोबाईल नंबर, डिस्चार्ज पुस्तक, ओळख पत्र, पीपीओ ची छायांकीत प्रत व बँक पास बुक घेवून यावे, असे आवाहन रेकॉर्डस मराठा लाईट रेजिमेंटद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रेकॉर्डस मराठा लाईट रेजिमेंट व्हॉटसॲप क्र. 8317350584 वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवरुन चौकशी करु शकतात, असेही डॉ. भिमसेन चवदार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.