SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंदडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसॅन मरीनो: जगातील सर्वात जुने आणि अविरत प्रजासत्ताकप्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त कराकोल्हापूर : उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई, 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूलनेपाळ दुर्घटना: बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये डीएनए नमुना संकलन सुरूसभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शाश्वत शेती काळाची गरज : अंकुश पाटील; कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पिक परिसंवाद उत्साहातरोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजन

जाहिरात

 

प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त करा

schedule02 Sep 26 person by visibility 255 categoryमहानगरपालिका

◼️उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर महापालिकेची कारवाई; अतिक्रमणधारकांनी साहित्य स्वतःहून हटविण्याचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसाधारण रुग्णालयांच्या परिसरातील फेरीवाला अतिक्रमणाबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दि.18 ऑगस्ट 2026 रोजी आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था व सर्वसाधारण रुग्णालयांपासून 100 मीटरच्या परिसरात हॉकिंग अथवा फेरीवाला व्यवसायास परवानगी देणे योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

   या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील संबंधित परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण तसेच व्यवसायाचे साहित्य स्वतःहून तात्काळ हटवावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. संबंधितांनी अतिक्रमण स्वतःहून न हटविल्यास महानगरपालिकेमार्फत सदर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

  महानगरपालिका महासभेच्या ठरावानुसार कारवाईदरम्यान हटविण्यात आलेले अथवा जप्त करण्यात आलेले व्यवसायाचे साहित्य संबंधितांना परत करण्यात येणार नाही. त्यामुळे फेरीवाले व व्यावसायिकांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.

  शहरातील नागरिकांनी तसेच संबंधित फेरीवाले व व्यावसायिकांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती घेऊन त्याचे पालन करावे आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes