SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंदडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसॅन मरीनो: जगातील सर्वात जुने आणि अविरत प्रजासत्ताकप्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त कराकोल्हापूर : उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई, 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूलनेपाळ दुर्घटना: बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये डीएनए नमुना संकलन सुरूसभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शाश्वत शेती काळाची गरज : अंकुश पाटील; कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पिक परिसंवाद उत्साहातरोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजन

जाहिरात

 

शाश्वत शेती काळाची गरज : अंकुश पाटील; कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पिक परिसंवाद उत्साहात

schedule02 Sep 26 person by visibility 197 categoryउद्योग

कोथळी :  शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी अवलंब केला पाहिजे. शेतकरी पिकवतो ते विकता आलं पाहिजे. आज घराघरात शेतीवर व शेतीसाठी चालणारे व्यवसाय सुरू करून आपण भविष्यातील अडचण ओळखले पाहिजे असे मत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमानाने ऊस पीक परिसंवाद व गळीत धान्य विकास कार्यक्रम आयोजित दरम्यान कृषी विज्ञान संत अंकुश पाटील यांनी व्यक्त केले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, कमी खर्चामध्ये शेती करा. शेतकऱ्यांनी चांगले काय, बनावट काय, योग्य काय हे ओळखता आले. पाहिजे शेती मधील अनेक खते आपल्याला घरी बनवता येतात. आपण शेतीला वाचवण्यासाठी व शेती योग्य औषध बनवण्यासाठी हे ऊस पीक परिसंवाद आयोजन करत असतो. यातील सर्वांनी अशा पद्धतीने कमी खर्च उत्पन्न जास्त हा मार्ग निवडला पाहिजे असे मत त्यावेळी बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंत्री आ. डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर) उपस्थित होते.

  सदरचा कार्यक्रम कोथळी विकास सेवा सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हे शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे उपस्थित होते. 
   
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे यांनी केले. दरम्यान तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 

 यावेळी जिल्हा परिषद सदस्य नंदिनी संदीप कांबळे, पंचायत समिती सदस्य ज्योती शरद कांबळे, कोथळी गावचे सरपंच  सुजाता भिमगोंडा बोरगावे, क्रांती समूहाचे प्रमुख देवगोंडा पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील, कवठेसार  गावचे सरपंच पोपट भोकरे, शरद कारखान्याचे संचालक आप्पासो चौगुले, सुभाषसिंह राजपूत, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक गौतम इंगळे, मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप व प्रकाश फाळके, सुभाष दूध संस्थेचे चेअरमन भिमगोंडा बोरगावे, यड्राव बँकेचे व्हा.चेअरमन दिलीप मगदूम, महावीर पतसंस्थेचे चेअरमन बाहुबली इसरांना, श्रीमंत बाबाराजे खर्डेकर सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब विभूते, क्रांती पतसंस्थेचे संचालक राजेंद्र नांदणे यासह मोठ्या संख्येने नागरिक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी संजय सुतार तसेच कार्यक्रमाचे नियोजन कृषी विभाग कृषी सहाय्यक प्रशांत राजमाने, आत्मा विभागाचे कीर्तीकुमार पाटील, शरद सहकारी साखर कारखाना शेती विभाग अधिकारी रमेश गंगाई, शेती अधिकारी सुधाकर पाटील व शरद सहकारी साखर कारखाना जयसिंगपूर विभाग प्रमुख शितल झळके यांनी केले होते. आभार संजय नांदणे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes