SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंदडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसॅन मरीनो: जगातील सर्वात जुने आणि अविरत प्रजासत्ताकप्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त कराकोल्हापूर : उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई, 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूलनेपाळ दुर्घटना: बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये डीएनए नमुना संकलन सुरूसभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शाश्वत शेती काळाची गरज : अंकुश पाटील; कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पिक परिसंवाद उत्साहातरोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजन

जाहिरात

 

डी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात

schedule03 Sep 26 person by visibility 144 categoryशैक्षणिक

तळसंदे: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील अन्न तंत्रज्ञान विभागातर्फे बी.टेक. आणि तसेच एम.एस्सी. फूड सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय एच.ए.सी.सी.पी, एफ.एस.एस.सी आणि फॉस्टॅक अंतर्गत ऑडिटर प्रशिक्षण संपन्न झाले.  

अन्न प्रक्रिया व निर्मिती उद्योगांमध्ये अन्न स्वच्छता, अन्न सुरक्षा, गुणवत्ता व्यवस्थापन आणि सुरक्षित उत्पादन पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना सखोल तसेच व्यावहारिक ज्ञान मिळावे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. प्रमाणित मास्टर ट्रेनर डॉ. रामेश्वर जाजू यांनी विद्यार्थ्यांना ‘हॅझर्ड ॲनॅलिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट’ अर्थात एचएसीसीपी, एफएसएससी २२००० आणि फॉस्टॅक मानकांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. अन्न उद्योगातील स्वच्छता, सुरक्षितता, गुणवत्ता आणि योग्य दस्तऐवजीकरणाचे महत्त्व त्यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले.

प्रशिक्षणात अन्न स्वच्छता व स्वच्छताविषयक पद्धती, अन्न सुरक्षेतील संभाव्य धोके, जीएमपी, जीएचपी, पीआरपी, क्रिटिकल कंट्रोल पॉइंटची ओळख, धोक्यांचे विश्लेषण, क्रिटिकल लिमिट्स, निरीक्षण व सुधारात्मक उपाययोजना, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली आणि अंतर्गत ऑडिट प्रक्रिया याबाबत सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया व उत्पादन उद्योगांमध्ये अन्न सुरक्षा मानकांची अंमलबजावणी आणि ऑडिटची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजून घेता आली.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली, स्वच्छता पद्धती, जोखीम विश्लेषण आणि अंतर्गत ऑडिट यासंबंधी आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानासोबतच औद्योगिक कौशल्यविकास आणि रोजगारक्षमतेसाठी या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होईल असा विश्वास  अन्न तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रमसिंह इंगळे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे,  आयक्यूएसी संचालक डॉ. शिवानंद शिरकोळे आणि प्रा. कुमार चक्रे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes