SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंदडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसॅन मरीनो: जगातील सर्वात जुने आणि अविरत प्रजासत्ताकप्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त कराकोल्हापूर : उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई, 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूलनेपाळ दुर्घटना: बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये डीएनए नमुना संकलन सुरूसभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शाश्वत शेती काळाची गरज : अंकुश पाटील; कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पिक परिसंवाद उत्साहातरोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजन

जाहिरात

 

रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंद

schedule03 Sep 26 person by visibility 187 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलाव येथे महापालिकेच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे सुरू करण्यात येत आहेत. नागरिक व पर्यटकांना रंकाळा तलावाचे सौंदर्य अनुभवता यावे यासाठी कारंजे नियमित सुरू ठेवण्यास आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मान्यता दिली आहे.

   रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई व ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे बसविण्याचे भाग-१ व भाग-२ मधील काम मे.स्टार रिवाइंडर अँड इलेक्ट्रिकल्स यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रत्येक आठवड्यात शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस कारंजे सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार या चारही दिवशी सायंकाळी ७.३० ते ७.४५ आणि ८.३० ते ८.४५ या दोन वेळेत आकर्षक विद्युत रोषणाई व ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे सुरू राहणार आहेत.

  रंकाळा तलावाच्या नयनरम्य वातावरणात विद्युत रोषणाई, संगीत आणि कारंज्यांचे आकर्षक दृश्य नागरिकांना पाहता येणार असून यामुळे रंकाळा तलावाच्या पर्यटन सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा आनंद घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes