SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंदडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसॅन मरीनो: जगातील सर्वात जुने आणि अविरत प्रजासत्ताकप्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त कराकोल्हापूर : उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई, 31 हजार 700 रुपयांचा दंड वसूलनेपाळ दुर्घटना: बेपत्ता नागरिकांच्या ओळखीसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये डीएनए नमुना संकलन सुरूसभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शाश्वत शेती काळाची गरज : अंकुश पाटील; कृषी विभाग व शरद सहकारी साखर कारखाना आयोजित ऊस पिक परिसंवाद उत्साहातरोजगार महाकुंभ मेळाव्याचे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आयोजन

जाहिरात

 

सभासदांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये जमा करणार : चेअरमन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घोषणा; शरद सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा

schedule02 Sep 26 person by visibility 334 categoryसामाजिक

नरंदे : शरद साखर कारखान्याकडून मागील वर्षाच्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा २६३ रुपये दर जादा दिला आहे. तर ३५०० पैकी दुसरा १०० रुपयाचा हप्ता आठ दिवसात उत्पादकांच्या खात्यावर जमा करणार आहे. अशी माहिती शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली.      

 नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. प्रारंभी संस्थापक शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक एम. एम. पट्टणकुडे यांनी अहवाल वाचन केले.

 विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली. यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम कालावधी सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकासह कामगार यांच्या समन्वयाने आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी तोडणी आणि वाहतूक यंत्रणा सक्षम केली आहे. साखर, उपपदार्थ, डिस्टलरी, सहवीज प्रकल्पातून जास्तीत जास्त  उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नसल्याने कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणे आवश्यक आहे. कारखाना आणि शेतकरी दोघांनाही स्पर्धेत टिकण्यासाठी एआय तंत्रज्ञान स्वीकारणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञान वापरल्यास एकरी दहा ते वीस टन ऊस उत्पादन वाढू शकते. ऊस उत्पादकांनी भविष्यात एआय तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. यावेळी सभासदांच्या लेखी प्रश्नांना चेअरमन यड्रावकर यांनी उत्तरे दिली.

 यावेळी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कारखान्याच्या वतीने धनादेशाचे वाटप करण्यात आले. शहीद जवानासह अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत संचालक संजय नांदणे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, संचालक आदित्य पाटील यड्रावकर, डी. बी. पिष्टे, अभिजीत भंडारी, आप्पासो चौगुले, बाबगोंडा पाटील, दिलीप पाटील, केशव राऊत, बाबा पाटील, कुरुंदवाड चे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, दादासो पाटील, अक्षय आलासे,  संचालक सुभाष सिंग रजपूत, गुंडा इरकर, रावसाहेब चौगुले, रावसाहेब कुंभोजे, विद्यासागर मरजे, शिवगोंड पाटील, अण्णासाहेब सुतार, अजित उपाध्ये, यांचेसह बाळासो पाटील, अरुण पाटील, अजय पाटील, रवींद्र अनुसे, बी.ए.आवटी यांच्यासह  जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, शाहू आघाडीचे सदस्य जयसिंगपूर व कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक, सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आभार पोपट भोकरे यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes