SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

schedule20 Apr 26 person by visibility 83 categoryराज्य

मुंबई :  कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल. फिश मार्केट इमारत उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या. अध्यक्षतेखाली  झालेल्या  बैठकीस आमदार अमल महाडिक, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केट दर्जेदार व्हावे यासाठी जिल्हा नियोजनमधूनही निधी उपलब्ध करुन घ्यावा. या मार्केटसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडील अन्य योजनांचाही लाभ मिळवून दिला जाईल.

प्रस्तावित मार्केटमध्ये स्वच्छता, कोल्ड स्टोरेज, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक विक्रेत्यांना नियोजित बाजारपेठ मिळणार असून ग्राहकांनाही दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीनंतर गिरगाव चौपाटी येथे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या कोळी बांधवांच्या समस्यांचा सकारात्मक विचार करून  यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत पारंपरिक मच्छीमाराला मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे  मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes