SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरव

जाहिरात

 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

schedule20 Apr 26 person by visibility 140 categoryशैक्षणिक

🟠 देशभरातून सुमारे ४०० संघांचा सहभाग; ३० संघांची अंतिम निवड

कोल्हापूर  : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दिनांक २४ व २५ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉन ‘हॅकॅत्सोव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. 

या स्पर्धेसाठी पूर्वनिवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत देशभरातील सुमारे ४०० संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी ३० उत्कृष्ट संघांची निवड करण्यात आली आहे. २४ तास अखंड चालणारा हा बहुप्रतिक्षित स्पर्धात्मक महोत्सव तंत्रज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.

या टेक फेस्टमध्ये तब्बल ५०,००० रुपये किमतीची बक्षिसे दिली जाणार आहेत. तंत्रज्ञान, कल्पकता आणि सर्जनशीलता यांचा संगम असलेला हा महोत्सव विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असून, डॉ. विनायक पुजारी हे कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून कार्य पाहत आहेत. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes