SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण

जाहिरात

 

भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रम

schedule20 Apr 26 person by visibility 174 categoryशैक्षणिक

कोल्हापूर - केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयामध्ये  भारतीय हवाई दलाच्या वतीने एका विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मध्ये भारतीय वायुसेनेबद्दल स्वदेशी तंत्रज्ञानाबद्दल अनुक्रमे आकर्षण आणि विश्वास निर्माण करणे त्या सोबत वायुदलातील अभियंत्यांच्या निवड प्रक्रियेची,नियमांची माहिती करून देणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय वायुसेनेच्याच पुढाकारातून करण्यात आले होते. 

प्रारंभी भारतीय वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी स्क्वाड्रन लीडर राजन अरोरा व विंग कमांडर इलंकुमारन यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधून भारतीय वायुसेनेच्या कार्याची, बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली अभियंत्यांना विविध प्रकारच्या विभागातून काम करण्याची संशोधन करण्याची मोठी संधी वायुसेनेमध्ये आहे असे प्रतिपादन यांनी केले.

वायुसेनेच्या टीमने स्वतःसोबत एक लग्झरी गाडी आणलेली होती ज्या गाडीमध्ये एका बाजूला भारतीय वायुसेनेच्या विविध विमानांच्या प्रतिकृती आणि लढाऊ वैमानिकांद्वारे वापरले जाणारे 'ग्रॅव्हिटी सूट' देखील प्रदर्शित करण्यात आले होते. माहिती अत्यंत प्रभावीपणे सांगण्यात आली पण प्रदर्शितपण केली गेली.तसेच दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष ‘फ्लाईट सिम्युलेटर’ च्या माध्यमातून कशाप्रकारे विमान उडवले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला गेला. या सुवर्णसंधीचा उपयोग करून महाविद्यालयातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली व अधिकाऱ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.


केआयटी च्या विद्यार्थ्यांना शौर्य व एनसीसी या व्यासपीठावरून संरक्षण क्षेत्रातील विविध संधींची माहिती मिळतच असते पण भारतीय वायुसेनेने स्वत: पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे नक्कीच आमच्या महाविद्यालयातील तरुणपिढी भविष्यामध्ये भारतीय संरक्षण दलामध्ये स्वतःचे योगदान अधिक जोमाने देईल असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी वायुसेनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.केआयटीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातही सातत्याने असेच मार्गदर्शन वायुदलाकडून मिळाले तर आमचे विद्यार्थी नक्कीच या क्षेत्रात योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादामध्ये मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर व अकॅडमिक अधिष्ठाता डॉ.अक्षय थोरवत हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.श्रुती काशीद यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा.निलेश देसाई,प्रा.विनय प्रभावळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाच्या आयोजनात संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन,सचिव दीपक चौगुले अन्य विश्वस्त यांचे प्रोत्साहन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes