SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यड्राव बँकेची वाटचाल कौतुकास्पद : भालचंद्र पाटील; यड्राव बँकेच्या नेमीनाथनगर शाखेचे उद्घाटन एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढमाजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनसहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘गोकुळ’च्या कार्यपद्धतीचे कौतुकप्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाईराधानगरी भरले 97.98 टक्के; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीविज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज : डॉ. भूषण पटवर्धन जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार : ललित गांधीकोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदनगोकुळ दूध संघ निवडणूक बाबत उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश

जाहिरात

 

यड्राव बँकेची वाटचाल कौतुकास्पद : भालचंद्र पाटील; यड्राव बँकेच्या नेमीनाथनगर शाखेचे उद्घाटन

schedule29 Jul 26 person by visibility 221 categoryउद्योग

सांगली : माजी मंत्री आणि शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थ नेतृत्वाखालील यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेच्या जगात उत्तम कामगिरी केली असल्यामुळे ग्राहकामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे, बँकेचे एकूण काम आणि वाटचाल कौतुकास्पद असल्यामुळे सांगली शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा निश्चितपणे मिळेल, आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा बँकेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या पाठीशी कायम राहतील असे उदगार दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी काढले, यड्राव को-ऑपरेटिव बँकेच्या सांगली येथील नेमीनाथनगर परिसरातील सातव्या शाखेचे उद्घाटन बुधवारी संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे मुख्य मार्गदर्शक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. 

उत्साही वातावरणात यड्राव बँकेच्या नेमिनाथनगर सांगली येथील सातव्या शाखेचा उद्घाटन संभारंभ संपन्न झाला, कार्यक्रमाचे स्वागत बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम यांनी केले, बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी आपली बँक या परिसरातील ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सज्ज असून डिजिटल बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून दर्जेदार सेवा देताना बँकेच्या माध्यमातून ग्राहकांचा नेहमी सन्मान राखला जाईल असे सांगितले,

सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर यांनी शेतकऱ्यांची मुले उद्योजक निर्माण व्हावीत या उद्देशाने 1995 साली यड्राव बॅंकेची स्थापना केली आज जयसिंगपूरसह सात शाखांच्या माध्यमातून बँक प्रभावीपणे काम करीत असून बँकेने मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे, सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील शाखेनंतर सांगलीतील नेमिनाथनगर  परिसरात सांगली जिल्ह्यातील दुसरी शाखा आम्ही सुरू करीत आहोत, बँक चालवताना जसे ठेवीदारांच्या कडे पाहिले जाते त्याचप्रमाणे बँकेला चांगले कर्जदार लाभले तर बँकांचा उत्कर्ष झपाट्याने होतो, आणि मग बँक आणि ग्राहक यांच्या मध्ये विश्वासहर्ता निर्माण झाली की मग बँकेची आणि त्याचबरोबर ग्राहकाची देखील वेगाने प्रगती होते, यड्राव बॅंकेच्या माध्यमातून या परिसरातील शेतकरी व्यवसायिक उद्योजकांना नेहमी मदतीचा हात राहील असे उदगार बँकेचे मुख्य मार्गदर्शक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी बोलताना काढले. यावेळी बँकेमधील लॉकर्स सुविधा, आणि एटीएम मशीन यांचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, 

बँकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सन्मान करण्यात आला, जयसिंगपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,आदित्य पाटील यड्रावकर, विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती चोपडे, सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यड्रावकर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतिनाथ कांते, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक विष्णू माने, उद्योगपती मनोहर सारडा, राजशेखर सदलगी, जयपाल कनवाडे, इंजिनीयर राजेश पाटील, व्ही. के.बस्तवाडे, निलेश पाटील, उद्योगपती शांतिनाथ पाटील, संचालक उदय पाटील, बदनीकाई साहेब, संतनिवास चे अध्यक्ष सुहास पाटील, जैन बोर्डिंगचे प्राध्यापक राहुल चौगुले, मिलनभाई शहा, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे, जयसिंगपूर नगरपरिषदेचे मान्यवर नगरसेवक परिसरातील व्यापारी, उद्योजक नागरिक बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बँकेचे अधिकारी प्रवीण म्हैसाळकर यांनी मानले तर 
सूत्रसंचलन बबन यादव यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes