SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यड्राव बँकेची वाटचाल कौतुकास्पद : भालचंद्र पाटील; यड्राव बँकेच्या नेमीनाथनगर शाखेचे उद्घाटन एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढमाजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनसहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘गोकुळ’च्या कार्यपद्धतीचे कौतुकप्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाईराधानगरी भरले 97.98 टक्के; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीविज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज : डॉ. भूषण पटवर्धन जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार : ललित गांधीकोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदनगोकुळ दूध संघ निवडणूक बाबत उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश

जाहिरात

 

जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार : ललित गांधी

schedule29 Jul 26 person by visibility 215 categoryराज्य

कोल्हापूर :  देशात, राज्यात अत्यंत अल्पसंख्यांक असणाऱ्या जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहासाठी आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील. असे प्रतिपादन जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जैन समुदायाच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले,राज्यातील 8 जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने जैन मुला-मुलींचे प्रत्येकी 1 याप्रमाणे 16 वसतिगृह उभारण्यात येणार आहेत.

 कोल्हापुरातही येत्या आर्थिक वर्षाअखेर या वसतीगृह उभारणीला प्रारंभ होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दोन एकर जागा मागितली आहे. जेणेकरून जैन समुदायातील मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. जिल्ह्यात या समुदायाची 8-क तर 3- ब वर्गाची तीर्थक्षेत्र असून यांच्या विकासाकरिता शासन अनुकूल आहे . समाजाच्या विकासासाठी शासनाकडून मिळणारा निधी हा समाजाच्या पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने खर्च करण्याला आपले प्राधान्य असेल. या अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे ते म्हणाले .

        जिल्हाधिकारी डॉ राठोड म्हणाले,जैन समुदायाच्या विकास विषयक कामांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील. जिल्ह्यात ज्या गावात जैन समुदायाच्या लोकांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी पोलीस विभागाने शांतता कमिटीत जैन समुदायातील लोकांना स्थान द्यावे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास निधीतून स्थानिक तीर्थक्षेत्रामध्ये लोकपयोगी कामे करण्याला जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमीन यांनी जैन समुदयासाठी महिला व बाल विकास विभागातर्फे(एकात्मिक बाल विकास सेवा योजना) राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. 
 
श्री गांधी यांनी जिल्हा नियोजन,जिल्हा परिषद,शिक्षण विभाग (माध्य./प्राथ.), महिला व बाल विकास,पो.अधीक्षक कार्यालय,कोल्हापूर /इचलकरंजी(मनपा),जिल्हा उद्योग केंद्र,जिल्हा ग्रामीण बँक,एमआयडीसी आदी विभागांकडून जैन अल्पसंख्यांक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि सामाजिक प्रश्नांच्या अनुषंगाने दिर्घ आढावा घेतला.

   या बैठकीत जैन धर्मियांना येणाऱ्या विविध अडचणींचा सामना उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी सांगितला. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख,मनपा शहर अभियंता रमेश मस्कर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव,जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी योगेश कुंभार यांच्यासह  जिल्ह्यातील इतर जैन समाज प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes