SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यड्राव बँकेची वाटचाल कौतुकास्पद : भालचंद्र पाटील; यड्राव बँकेच्या नेमीनाथनगर शाखेचे उद्घाटन एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढमाजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनसहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘गोकुळ’च्या कार्यपद्धतीचे कौतुकप्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाईराधानगरी भरले 97.98 टक्के; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीविज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज : डॉ. भूषण पटवर्धन जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार : ललित गांधीकोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदनगोकुळ दूध संघ निवडणूक बाबत उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश

जाहिरात

 

प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई

schedule29 Jul 26 person by visibility 144 categoryमहानगरपालिका

◼️गांधीनगरातील व्यापाऱ्यावर ५ हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्त

कोल्हापूर : बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगर परिसरातील दुकानांची या पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये सचिन ट्रेडर्स या दुकानात सुमारे १४४ किलो वजनाचा अंदाजे रु.३६ हजार किंमतीचा प्लास्टिकचा साठा आढळून आला. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर रु. ५ हजारांचा दंड करुन तो वसूल करण्यात आला.

   प्लास्टिकचा संपूर्ण साठाही जप्त करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेने गेल्या दहा दिवसांपासून या पथकामार्फत शहरात प्लास्टिकमुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असून नागरिक व व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा रस्ते व नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास संबंधित कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes