SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यड्राव बँकेची वाटचाल कौतुकास्पद : भालचंद्र पाटील; यड्राव बँकेच्या नेमीनाथनगर शाखेचे उद्घाटन एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढमाजी सैनिक व त्यांच्या पाल्यांचा सन्मान; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनसहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ‘गोकुळ’च्या कार्यपद्धतीचे कौतुकप्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाईराधानगरी भरले 97.98 टक्के; जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीविज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज : डॉ. भूषण पटवर्धन जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार : ललित गांधीकोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदनगोकुळ दूध संघ निवडणूक बाबत उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश

जाहिरात

 

एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

schedule29 Jul 26 person by visibility 179 categoryराज्य

◼️ ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय
मुंबई : एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.

“एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

या मुदतवाढीमुळे एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes