SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!

जाहिरात

 

शास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्न

schedule18 Mar 26 person by visibility 110 categoryशैक्षणिक

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने दोन दिवसीय 'शास्त्रीय संगीत कार्यशाळा' उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत पुणे येथील ज्येष्ठ मार्गदर्शिका  मा. प्रा. डॉ. सौ. पौर्णिमा धुमाळे (एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ) यांनी 'शास्त्रीय गायनातील सौंदर्य विचार' आणि 'संगीत संशोधन पद्धती' या विषयांवर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डॉ. धुमाळे यांनी विद्यार्थ्यांची संगीतातील दृष्टी विकसित करण्यावर भर दिला. स्वर, लय आणि बंदिश हे शास्त्रीय संगीतातील तीन मूलभूत घटक असून ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत, हे त्यांनी प्रात्यक्षिकासह पटवून दिले.

 विशेषतः भूप रागातील 'मोरा झांज मंदरवा' आणि दरबारी कानाडा रागातील 'झनक झनकवा मोरे बिछुवा' या बंदिशींच्या माध्यमातून त्यांनी संगीतातील सौंदर्यात्मक बारकावे शिकविले. या बंदिशी शिकवितानाच त्यांनी या रागांशी साधर्म्य असणाऱ्या जवळच्या रागांचाही चिकित्सक मागोवा घेत, त्यातील सूक्ष्म फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आवाजाची फेक, मिंड, गमक, नोमतोम याद्वारे गायकी समृद्ध करणे आणि मोजक्या स्वरांमध्ये प्रभावी तान घेण्याचे कौशल्य याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी 'संगीत संशोधन पद्धती' या विषयावर चर्चा करण्यात आली. नव्या शैक्षणिक धोरणातील (NEP) संशोधनाचे महत्त्व विषद करतानाच, संशोधनाचा वैयक्तिक विकासासाठी कसा फायदा होतो, यावर डॉ. धुमाळे यांनी प्रकाश टाकला.

 संशोधनासाठी विषय निवड, भाषेचा वापर, रिसर्च पेपर लेखन आणि त्यातील विविध घटकांची मांडणी कशी करावी, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिविभागाचे प्र. विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले. या कार्यशाळेला तबला साथ गिरीधर कुलकर्णी व ओंकार सूर्यवंशी यांनी केली, तर हार्मोनिअम साथ डॉ. धुमाळे यांच्या शिष्या गौरी पाटील यांनी केली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिवानी ढेरे,  गौरी कुलकर्णी,  वंदना आठले व  अतुल परीट या आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.

रंगमंच व्यवस्था संदेश गावंदे व मल्हार जोशी यांनी पाहिली, तर साऊंड व्यवस्था विक्रम परीट यांनी सांभाळली. या कार्यशाळेला अधिविभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शहरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अतुल परीट यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes