SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावागोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटनसहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवरून 'गोकुळ'मध्ये राजकीय खळबळ!थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना: भारताच्या अंतराळ प्रवासाचा सुवर्णटप्पा!गोकुळ निवडणूक : सरकार शासकीय संचालकांना मताचा अधिकार देणार नाही, दिल्यास आम्ही कोर्टात : आमदार सतेज पाटील"ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध!" – दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधींचा घणाघातसडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्तडिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधवविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; चिपरी येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

गोकुळ निवडणूक : सरकार शासकीय संचालकांना मताचा अधिकार देणार नाही, दिल्यास आम्ही कोर्टात : आमदार सतेज पाटील

schedule01 Nov 26 person by visibility 354 categoryराजकीय

कोल्हापूर : गोकुळ मध्ये शासकीय सदस्य नेमणार, त्यांना मताचा अधिकार देणार अशी चर्चा आहे. मात्र, केवळ गोकुळसाठी सरकार असे काही करेल असे वाटत नाही. मात्र, त्यांनी असे काही केलेच तर आम्ही कोर्टात जाऊ, अशी भूमिका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना मांडली.

आमदार पाटील म्हणाले, गोकुळ मध्ये शासकीय सदस्य नेमून त्यांना मताचा अधिकार देणार असतील तर मग जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती येथेही तज्ज्ञ सदस्य आहेत, त्यांनाही मताचा अधिकार देणार का?.

साडेपाच लाख शेतकऱ्यांनी समविचारी आघाडीला बहुमत दिले आहे. तांत्रिक मुद्द्यावरुन गोकुळची पहिली बैठक पुढे गेली आहे. उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांत चेअरमनची निवड होणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तरी निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचे आमदार पाटील म्हणाले. आता सध्या हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. ठरावधारकांनी आम्हाला बहुमत दिले आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्दा न करता अध्यक्ष निवड व्हावी, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

◼️ आम्हाला मिळालेले बहुमत सत्ताधारी मान्य करायला तयार नाहीत. उलट त्यांनी पुढील पाच वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागावे. आमचे बहुमत पाच वर्षे असेच राहील, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes