SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावागोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटनसहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवरून 'गोकुळ'मध्ये राजकीय खळबळ!थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना: भारताच्या अंतराळ प्रवासाचा सुवर्णटप्पा!गोकुळ निवडणूक : सरकार शासकीय संचालकांना मताचा अधिकार देणार नाही, दिल्यास आम्ही कोर्टात : आमदार सतेज पाटील"ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध!" – दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधींचा घणाघातसडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्तडिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधवविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; चिपरी येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन

schedule02 Nov 26 person by visibility 265 categoryउद्योग

◼️दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ; दुग्ध व्यवसायाला मिळणार नवी चालना


वारणानगर  : पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी  येथे श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या केंद्रामुळे दापोली तालुका व  परिसरात रोजगारनिर्मिती होणार असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संकलन व साठवणुकीसाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाल्याने दुग्ध व्यवसायाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

संघाचे अध्यक्ष एच.आर.जाधव कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना वारणा सहकार समूहामुळे व आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली वारणा परिसराचा झालेला विकास याची माहिती दिली.उपाध्यक्ष अँड एन.आर.पाटील यांनी कोकण भागात रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल असे सांगितले. 

कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर  यांनी वारणा सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल असून याचा विकासरूपी लाभ करून घेण्यासाठी सर्व दूध उत्पादकांनी  जास्तीत जास्त स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवठा करावा असे आवाहन करत संघाच्या सर्व योजना दूध उत्पादकांना पूरविन्यात येतील असे सांगितले. 
वारणा दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण भागात दूध संकलन, शीतकरण व प्रक्रिया यंत्रणेचा विस्तार करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालगड ता.दापोली येथे दूध शीतकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

या केंद्रामुळे परिसरातील दूध उत्पादकांना दूध वेळेत संकलित करून योग्य तापमानात शीतकरण करण्याची सुविधा मिळणार आहे. परिणामी दुधाची गुणवत्ता व प्रत टिकवून ठेवण्यास मदत होईल. तसेच दूध वाहतुकीवरील वेळ व खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय अधिक सक्षमपणे करता येणार आहे. कोकणातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्याबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या शीतकरण केंद्राची दूध संकलन क्षमता 10 हजार लिटर असून या दूध संघाचा व्यवसाय वाढीसाठी फायदा होणार आहे.पहिल्या दिवशीच दूध उत्पादकानाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी दूध उत्पादकांसाठी अमृतबंध योजनेची घोषणा करण्यात आली.या दूध शीतकरण केंद्रामुळे पालगड व परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात या भागातील दूध संकलनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी संघाचे संचालक मंडळ,गावचे सरपंच संतोष आंबेकर,सुरेश कांबळे या मान्यवरासह संघाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.संकलन व्यवस्थापक डॉ. जे.बी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले व फॅक्टरी मॅनेजर धनंजय लाड यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes