SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावागोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटनसहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवरून 'गोकुळ'मध्ये राजकीय खळबळ!थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना: भारताच्या अंतराळ प्रवासाचा सुवर्णटप्पा!गोकुळ निवडणूक : सरकार शासकीय संचालकांना मताचा अधिकार देणार नाही, दिल्यास आम्ही कोर्टात : आमदार सतेज पाटील"ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध!" – दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधींचा घणाघातसडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्तडिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधवविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; चिपरी येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधव

schedule01 Nov 26 person by visibility 249 categoryशैक्षणिक

◼️दूरशिक्षण  व ऑनलाईन शिक्षण केंद्रात ऑनलाईन अभ्यासक्रमाचा दीक्षारंभ सोहळा

कोल्हापूर : डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या नव्या संधी  विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांनी प्रतिपादन  केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने ऑनलाइन एम.बी.ए., ऑनलाइन एम.कॉम. आणि ऑनलाइन एम.एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमांच्या नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग मार्गदर्शन तत्वानुसार तीन दिवसीय ‘दीक्षारंभ – विद्यार्थी उद्बोधन कार्यक्रम २०२६–२७’ आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

डॉ.जाधव म्हणाल्या की,पारंपरिक वर्गाधारित शिक्षणापासून आधुनिक ऑनलाइन अध्यापन-अध्ययन पद्धतीकडे  विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. शिक्षण, विद्यार्थ्यांची प्रतिभा, कौशल्य विकास आणि मानवी मूल्ये यांचा सुंदर संगम या उपक्रमातून मिळतोय ही अभिनंदनीय गोष्ट आहे.विद्यार्थ्यांनी  स्वयंशिस्त, वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर केला पाहिजे. केवळ पदवी संपादन न करता व्यावहारिक ज्ञान, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि व्यावसायिक नैतिकता विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार कौशल्याधारित व गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे आहे.

संचालक प्रा.डॉ. पी. एस. पाटणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.नगिना माळी आणि श्रीमती प्रियांका सुर्वे  यांनी सूत्रसंचालन केले, तर दयानंद गवाडे यांनी आभार  मानले.

दुसऱ्या दिवशी वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. केदार व्ही. मारुळकर यांनी ‘ऑनलाइन शिक्षणाचे चार चतुष्कोन (Four Quadrants of Online Learning)’ या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी बहाई अकादमी, पाचगणीचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी व कार्यक्रम समन्वयक श्री. पराग टंडले यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील व्यावसायिक उत्कृष्टता, नैतिक विकास आणि मानवी मूल्यांसाठी शिक्षण’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. प्रियांका सुर्वे  यांनी समारोप सत्राचे सूत्रसंचालन केले, तर श्रीमती  नाझिया मुल्लाणी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes