SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावागोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!पालगड येथे वारणा दूध संघाच्या आधुनिक दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटनसहकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीवरून 'गोकुळ'मध्ये राजकीय खळबळ!थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना: भारताच्या अंतराळ प्रवासाचा सुवर्णटप्पा!गोकुळ निवडणूक : सरकार शासकीय संचालकांना मताचा अधिकार देणार नाही, दिल्यास आम्ही कोर्टात : आमदार सतेज पाटील"ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध!" – दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधींचा घणाघातसडोली खालसा येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जणांवर कारवाई, ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्तडिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी : डॉ.ज्योती जाधवविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; चिपरी येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

गोकुळ’चा अध्यक्ष निवडण्याचा मार्ग मोकळा; १० नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सभा!

schedule02 Nov 26 person by visibility 404 categoryउद्योग

◼️ कोल्हापूर सर्किट बेंचचा दणका; आज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत सर्व संचालकांना नोटिसा बजावण्याचे निर्देश

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेला राजकीय वाद अखेर अंतिम टप्प्यात आला असून, कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालानुसार १० नोव्हेंबर रोजी गोकुळच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी सभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या दणक्यानंतर आता सर्वच संचालकांना आज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत नोटिसा पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गोकुळच्या अध्यक्ष निवडीसंदर्भातील घडामोडींवर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की, १० नोव्हेंबर रोजी गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी सभा घ्यावीच लागेल. या संपूर्ण निवडणुकीत यापूर्वी ‘कोरम’  अभावी सभांना जो पेच निर्माण झाला होता, त्यावर न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत.
यापूर्वी २९ ऑक्टोबर रोजी झालेली पहिली सभा महायुतीच्या १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे कोरम अभावी तशीच रद्द करावी लागली होती. कायदेशीर पद्धतीने अध्यक्ष निवडला गेला नसल्याने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी होऊन न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी सभा घेण्याचा निर्णय सुनावला आहे.


या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, २५ पैकी सर्वच्या सर्व २५ संचालकांना या अध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे. यात समविचारी आघाडीचे १३ आणि ‘ महायुतीचे १२ संचालक निवडून आलेले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, या निवडणुकीत सर्व संचालकांची उपस्थिती अनिवार्य असणार असून आज संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत सर्व विजयी संचालकांना यासंबंधीच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
न्यायालयाच्या या आदेशामुळे आता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या राजकारणाला पुन्हा एकदा तीव्र वेग आला असून, १० नोव्हेंबरच्या सभेमध्ये नेमकी काय रणधुमाळी पाहायला मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes