SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

जाहिरात

 

खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

schedule27 Jun 26 person by visibility 131 categoryसामाजिक

खिद्रापूर : खिद्रापूर गावकऱ्यांच्या घरांवर, हक्कांवर आणि भवितव्यावर गदा येऊ देणार नाही. गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कायदेशीर लढाई मी लढेन. गरज पडल्यास उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, पण खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ठाम ग्वाही आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खिद्रापूर येथील बेमुदत धरणे आंदोलनाला भेट देताना दिली.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कारवाईविरोधात आणि गावकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी खिद्रापूर ग्रामस्थांनी शनिवारी गावाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवकांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
 
ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असले तरी गावातील नागरिक अनेक पिढ्यांपासून येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावावर मालमत्ता पत्रके, प्रॉपर्टी कार्ड तसेच शेतीची कागदपत्रे आहेत. असे असताना काहींनी न्यायालयात याचिका दाखल करून ग्रामस्थांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


गावाला भारतीय पुरातत्त्व कायद्यातील १०० व ३०० मीटर निर्बंधांतून सवलत द्यावी, गावकऱ्यांच्या घरांवर व मालमत्तेवर कोणतीही अन्यायकारक कारवाई करू नये आणि गावातील विकासकामांना तातडीने परवानगी द्यावी, अशा मागण्या घेऊन येथील ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहे. 
आंदोलनकर त्यांचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले, खिद्रापूरच्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे. कोणत्याही कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ देणार नाही. शासन, प्रशासन आणि न्यायालयीन पातळीवर जिथे जिथे पाठपुरावा करावा लागेल, तिथे मी स्वतः पुढाकार घेईन. गावाचा ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांचे हक्क अबाधित राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. संघर्ष कितीही मोठा असला तरी खिद्रापूरकरांनी घाबरू नये. हा लढा केवळ गावकऱ्यांचा नाही, तर माझाही आहे. न्याय मिळेपर्यंत मी खिद्रापूरच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes