SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

जाहिरात

 

पेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!

schedule27 Jun 26 person by visibility 119 categoryराज्य

कोल्हापूर : परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या व्यवस्थेला आता लगाम कोण लावणार? नीट (NEET) प्रकरणाची धग शांत होत नाही तोच, आता महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा (MAHA TET) पेपर फुटल्याच्या संशयावरून उद्या होणारी परीक्षा प्रशासनाने रद्द केली आहे. ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती मिळताच यंत्रणा खडबडून जागी झाली, पण तोपर्यंत लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले होते.

 वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्य सरकारच्या परीक्षा पद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या हजारो तरुणांच्या मेहनतीचा हा अपमान असून, भ्रष्ट टोळ्यांच्या या कारस्थानांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच बदनाम होत आहे.

  केवळ परीक्षा रद्द करून वेळ मारून नेण्यापेक्षा, या रॅकेटच्या मुळाशी जाऊन दोषींना कठोर शासन कधी होणार? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा असा लिलाव आणखी किती काळ चालणार? आता सरकार केवळ तारखांची घोषणा करणार की, या ‘पेपरफुटी’च्या कर्करोगाला कायमचे मुळासकट उपटून टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes