सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!
schedule27 Jun 26 person by visibility 184 categoryराज्य
कोल्हापूर : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या ताफ्यातील कारला रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. उगार येथून परतत असताना 'वडडी आणि कृष्णा घाट' दरम्यान अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात झाला.
धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला, मात्र कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने आमदार गाडगीळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जीव वाचला. सुदैवाने, या दुर्घटनेत आमदारांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदार मोठ्या अनर्थातून बचावल्याने परिसरात सुटकेचा नि:श्वास सोडला जात आहे.