SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

जाहिरात

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावा

schedule27 Jun 26 person by visibility 166 categoryउद्योग

◼️आकडेवारीवरून कुणीही गैरसमज पसरविण्याची गरज नाही
◼️दुबार व कोरे ठराव कुणालाही देऊ नका
        
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  ठरावसंख्या १,९८२ होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास आणि दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी केला आहे.

 आकडेवारीवरून कुणीही गैरसमज पसरविण्याची गरज नाही. दुबार व कोरे ठराव कुणालाही देऊ नका, असे आवाहनही  पाटील यांनी पत्रकात केले आहे.
     
पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवार दि. २५ जून २०२६ रोजी शक्तीप्रदर्शनाने १९७२ ठराव दाखल करण्यासाठी जाहीर केले होते. तालुकावार किती ठराव दाखल करणार याची आकडेवारी जाहीर केली होती. आम्ही  शक्ती प्रदर्शनाने तिथे गेल्यानंतर सहाय्यक निबंधक -दूग्ध कार्यालयासमोर फक्त ३०० ते ४०० लोकांची उभारण्याची व्यवस्था होती. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्राधिकृत अधिकारी सहाय्यक निबंधक- दुग्ध कृष्णा ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही किमान २००० लोक येणार आहोत. एवढ्याशा अपुऱ्या व्यवस्थित हे इतके लोक मावणार नाहीत, थांबणार नाहीत. त्यामुळे;  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही पुरेशी व चांगली व्यवस्था करा, असे सांगितले होते. शक्ती प्रदर्शनाने गेल्यानंतर प्रचंड गर्दी उडाली. श्री. ठाकरेंना जाब विचारल्यानंतर "मी प्रशासकांना अशी सूचना केली होती. परंतु; त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगितले. त्यावेळी आमचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांनी "प्रशासक कुठे आहेत?" अशी विचारणा केली. त्यावर प्रशासक रजेवर असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर  मुश्रीफ यांनी प्रशासक मंडळातील सदस्य  प्रदीप मालगावे यांना दूरध्वनीवरून  "तुम्ही मुद्दाम अशी अवस्था केली. कायदा सुव्यवस्था अडचणीत यावी आणि आमचे ठराव नोंद होऊच नयेत म्हणून हे कुटील कारस्थान तुम्ही  केले," असा आरोप त्यांनी केला होता. परंतु;  स्वतः. मुश्रीफ यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, अरुणराव डोंगळे,  शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, युवराज पाटील, किसनराव चौगुले, रणवीरसिंह गायकवाड, नवीद मुश्रीफ, छोटूराव इंगवले, सुधीर देसाई, सतीश पाटील -गिजवणेकर आदी नेतेमंडळी तीन- चार तास तिथे थांबले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना आपण सभासद नोंदणी करणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगून संध्याकाळी सात वाजेपर्यंत नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांना घरी जाऊन गाई- म्हशींच्या धारा  काढायच्या होत्या. महिला- म्हातारी माणसे यांचे ठराव त्यादिवशी घेऊ शकले नाहीत. त्यांना सोमवारी दि. २९ दाखल करू, असे सांगितले. अनेकानी गट्टे घेतले, त्याचा हिशोब त्यांना बरोबर करता आला नाही. 
         
▪️ते ठरावधारकही मतदानात आम्हालाच सहकार्य करतील.....!
आम्ही ठराव करण्याच्या आदल्या दिवशी ६१८ ठराव परस्पर सहाय्यक निबंधक- दूग्ध कार्यालयाकडे जमा झाले होते. हे ठराव जरी परस्पर दाखल झाले असले तरी त्यातील बहुतांशी ठराव हे गेल्या पाच वर्षातील आमचा कारभार पाहता मतदानामध्ये आम्हाला सहकार्य करतील, असा विश्वास आहे.
        
प्रशासनाने गुरूवार दि. २४ अखेर १,६५३ ठराव दाखल झाल्याची आकडेवारी जाहीर केली होती. दरम्यान ही चुकलेली आकडेवारी दुरुस्त करून प्रशासनाने ती शुक्रवारी दि. २६ रोजी ती  १,७४३ इतकी जाहीर केली. आकडेवारीत झालेला फरक दस्तूरखुद्द प्रशासनानेच मान्य केलेला आहे. अद्यापही आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही दाखल केलेल्या ठरावांच्या पोहोचपावत्या आमच्याकडे आहेत. आम्ही सोमवारी दि. २९ जाऊन याची खातरजमा करणार आहोत. आम्ही मंगळवारी दि. ३०  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते खालील पत्रकानुसार ठराव दाखल करणार आहोत. आम्ही दोन किंवा तीन जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन जमा झालेली प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर करणार आहोत. 
            
दुबार व कोरे ठराव कुणालाही देऊ नका......!
पक्की मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याच आठवड्यामध्ये प्रत्यक्षात सगळ्याच ठराव धारकांचा एक जिल्हास्तरीय मेळावा घेऊन प्रत्येक ठरावधारकाची फोटोग्राफी केली जाईल. त्यामुळे "दूध का दूध आणि पाणी का पाणी" होणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेतेमंडळी आणि ठरावधारकांना आमची कळकळीची विनंती आहे. अनेक पक्षाचे लोक आपली ठराव संख्या वाढवण्यासाठी कोरे ठराव द्यावेत किंवा दुबार ठराव द्यावेत, अशी मागणी करत आहेत. कोणीही या आमिषाला बळी पडू नये. असे झाल्यास ठराव बाद होण्याची शक्यता आहे.
         
[सोबत ठरावसंख्येचा तुलनात्मक तक्ता आहे.]

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes