खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा
schedule14 Aug 26 person by visibility 199 categoryसामाजिक
दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील बलमीम विकास सेवा संस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार 2017 मधे झाला होता. तो सरकारी ऑडीटर सचिदानंद पैलवान यांनी बाहेर काढला होता. यामध्ये दोशी असलेल्या संचालकांवर कारवाई करावी यासाठी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, बलमीम विकास सेवा संस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार 2017 मधे झाला होता. या संदर्भात करवीर पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा नोंद केला होता. तरीही पोलीसांनी दोषी संचालकांना जामीन मिळेपर्यंत अटक करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर एका कर्जदाराकडे सात लाख रुपये कर्ज भरलेली पावती आहे. संस्थेचे सचिव, चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक यांनी आज पर्यंत व्याजासहीत 14 ते 15 लाख रुपये 2020 पासून न संरचना बँक खात्यामधे भरणा केलेले नाही. हा भ्रष्टाचार झाला असल्यामुळे त्या कर्जदारावर सेक्रेटरी व संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
त्यासाठी मी 15 ऑगस्ट 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला असतानासुदधा महसूल सहायक, जिल्हाधिकारी,आवक लिपीक, पोलीस अधिक्षक, गृहराज्यमंत्री मुंबई महाराष्ट्र राज्य यांना यासंदर्भात दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी अर्ज केला होता तथापी कोणत्याही कार्यालयाने आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही त्यामुळे नाइलाजास्तव 15 ऑगस्ट रोजी कोणत्याही वेळेत कुठेही आत्मदहन करणार आहे असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांनी दिला आहे. या संदर्भात या भ्रष्टाचाराला पाठिशी घालणान्या सरकारी अधिका-यांची व संचालक यांची सर्वस्वी जबाबदारी असेल असा इशाराही सरदार बंगे यांनी निवेदनात दिला आहे.-