SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशाराकोल्हापूरच्या अक्षय मानेचा बँकॉक हायरॉक्स स्पर्धेत डंका; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा!प्रतिसरकारचे शोषणमुक्त समाजाचे स्वप्न ‘जेन-झी’ने साकारावे: डॉ. भारत पाटणकरडी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदेच्या २७१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

जाहिरात

 

देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखल

schedule14 Aug 26 person by visibility 137 category

* दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी दबावाखाली काम केल्याचा आरोप
        
कोल्हापूर : विभागीय उपनिबंधक (सहकारी संस्था, दुग्ध)  देवीदास मिसाळ आणि सहनिबंधक (दुग्ध, कोल्हापूर)  कृष्णा ठाकरे यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी अवमान याचिका दाखल झाली. करंजफेण ता. राधानगरी  येथील श्री. विठ्ठलाई महिला सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने उच्च न्यायालय सर्किट बेंच, कोल्हापूर येथे ही अवमान याचिका दाखल केली आहे. संस्थेच्यावतीने ॲड. भूषण मंडलिक यांनी ही अवमान याचिका दाखल केली आहे. संस्थेच्या अध्यक्षा  पल्लवी अनुप वाघरे यांनी ही माहिती दिली.
             
याबाबत अधिक माहिती अशी, उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, कोल्हापूर यांनी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी पारित केलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावणे, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे तसेच या संस्थांचा अवसायन आदेश रद्द केलेला असतानाही कच्च्या मतदार यादीमध्ये संस्थेचा समावेश न केल्यामुळे ही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
        
दि. २३ जून २०२६ रोजी न्यायालयाने सदर अवसायन आदेशास स्थगिती दिली होती. ही स्थगिती अंतिम निकाल होईपर्यंत म्हणजेच दि. १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत कायम होती. स्थगिती कायम असतानाही त्याचा चुकीचा अर्थ लावून, आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक या संस्थांना मतदानाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठी व मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यासाठी राजकीय हेतूने आणि दबावाखाली अवसायनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेला पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले आहेत.
       
◼️मतदार यादीतून बेकायदेशीरपणे वगळल्याचा आरोप.....!
उच्च न्यायालयाने दि. २३ जून व १ जुलै २०२६ रोजी अंतरीम स्थगीती दिली असताना आणि दि.  १२ ऑगस्ट २०२६ रोजी अवसायनाचा आदेश पूर्णपणे रद्द केला असतानाही, निवडणूक प्राधिकाऱ्यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या 'गोकुळ'च्या प्रारूप मतदार यादीतून याचिकाकर्त्या संस्थेसह इतर संस्थांची नावे जाणीवपूर्वक वगळली.
             
▪️मतदानापासून वंचित ठेवण्यासाठीच.........!
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून दूर ठेवण्याच्या वाईट हेतूनेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes