शिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंती
schedule01 Jul 26 person by visibility 99 categoryसामाजिक
कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार,
विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे, डॉ. ज्योतीप्रकाश यादव, संध्या आडसुळे, अनिल साळोखे, शशिकांत साळुंखे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.