SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: ताराबाई पार्कमध्ये झाड कोसळले; सहा गाड्यांचे नुकसान, एक जखमीएसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानीडॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदानशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंतीपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"

जाहिरात

 

डॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान

schedule01 Jul 26 person by visibility 214 categoryउद्योग

◼️कृषी क्षेत्रातील असीम योगदानाबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरव 
◼️मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यासह मान्यवरांची उपस्थिती 

मुंबई : कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च ,'डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न' पुरस्कारने राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.  पत्नी सौ. वैजयंती पाटील यांच्या समवेत डॉ. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 
समृद्ध, शाश्वत व आधुनिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्र वैश्विक स्तरावर देशाचे नेतृत्व करेल असा विश्वास राज्यपाल वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी विभागामार्फत 2023 व 2024  सालच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण  बुधवारी कृषी दिनी मुंबईतील वरळी येथे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर   वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल,  जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईल, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज  मांढरे , कृषी संचालक रफिक नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार २०२३ ने डॉ. संजय डी. पाटील तर २०२४ साठी यज्ञेश सावे याना सन्मानित करण्यात आले.  एकूण १८९ कृषी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले,आपण सर्वजण महान कृषी संस्कृतीचे वाहक, प्रेरणा स्रोत आहात. आपल्या कार्यामुळे पुरस्काराचा सन्मानही वाढला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  म्हणाल्या,  पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकरी शाश्वत शेतीकडे वळतील याची खात्री आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,  पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांनी इतरांसाठी दिशादर्शन, मार्गदर्शन करावे. त्यांच्या प्रगतीसाठी काम करावे. 
  
  कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी आभार मानले. 

यावेळी  शांतादेवी डी. पाटील,  वैजयंती संजय पाटील, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील,  सुप्रिया चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील,  पूजा ऋतुराज पाटील,  वृषाली पृथ्वीराज पाटील, स्नेहा तेजस पाटील, देवश्री पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा,  कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ. महादेव नरके, डी. एन शेलार, अमोल गाताडे, पी. डी. उके, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप व सहकारी, डी. वाय. पाटील ग्रुपचे अधिकारी,  पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes