SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: ताराबाई पार्कमध्ये झाड कोसळले; सहा गाड्यांचे नुकसान, एक जखमीएसआयआर अभियान राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा : भगवानदास सबनानीडॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात आरोग्यदायी उपक्रम: 'भाजप' आणि 'भागीरथी'च्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!गोकुळसाठी राष्ट्रवादीकडून अखेरच्या मूदतीपर्यंत एकूण १९७६ ठराव दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदानशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंतीपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूपुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनाडीकेटीईच्या दोन विद्यार्थ्यांची झेन्सार कंपनीत वार्षिक १० लाख पॅकेजवरती निवड​"अभिवादन हरितक्रांतीच्या प्रणेत्यांना.....!"

जाहिरात

 

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

schedule01 Jul 26 person by visibility 128 categoryराज्य

कोल्हापूर  : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळणार असून, दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून प्रोफाइल तयार करावे व विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा.

सध्या उपलब्ध असलेल्या काही इंटर्नशिप संधींमध्ये चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड येथे सेल्स अँड मार्केटिंग पदासाठी अर्जाची अंतिम तारीख 27 जुलै, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) साठी 14 जुलै, तर एचडीएफसी बँक लिमिटेडसाठी 22 जुलै अशी आहे. याशिवाय इतर अनेक कंपन्यांमध्येही इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत.

उमेदवारांना अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला भारत सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण दिले जाते. तसेच संबंधित कंपनीकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षणही उपलब्ध करून दिले जाते.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes