SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"ऊस उत्पादकांच्या न्यायासाठी 'अन्नत्याग' यशस्वी; चुयेकर यांच्या संघर्षाची मुख्यमंत्र्यांकडून दखल"महाराष्ट्रात दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमतापल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 46170 बालकांचे लसीकरणन्याय्य पदोन्नतीसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षकडॉ. जे. बी. शिंदे यांच्या दोन ग्रंथांचे प्रकाशनकर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चितडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवडपल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सेवा रुग्णालय येथे प्रारंभ नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान - सतीश मराठे" शालेय जीवनातील संस्कार व सदगुरूंचे मार्गदर्शन "

जाहिरात

 

नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान - सतीश मराठे

schedule28 Jun 26 person by visibility 183 categoryउद्योग

🔸वीरशैव बँकेचा शेड्युल्ड बँक आनंदोत्सव उत्साहात

कोल्हापूर :  नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी येथे केले.

श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेला नुकताच मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक दर्जा मिळाला. त्यानिमित्त आनंद भवन सभागृह येथे आनंदोत्सव आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, देशभरातील एकूण बँकांच्या तुलनेत वीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही आजच्या घडीला विशेष अभिनंदनाची बाब आहे. कारण कोविड, युक्रेन-रशिया युद्ध, अमेरिका-लढाई अशी विविध कारणांचा प्रत्येक क्षेत्राला परिणाम करणाऱ्या परिस्थितीही वीरशैवची कामगिरी उठावदार अशी आहे. उत्पादन, सेवा आणि शेती अशा तीनही क्षेत्रात देशाची आर्थिक कामगिरी उत्तम आहे. एल निनोचा थोडाफार प्रभाव पडेल.

ते म्हणाले, भारतीय गुंतवणूक वाढते आहे. निर्यातही वाढते आहे. ६८० मिलियन डॉलरची गंगाजळी आहे. अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारते आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना चांगले दिवस आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषता कोल्हापुरात निर्यात वाढते आहे. अशावेळी वीरशैव बँकेला आपले कार्यक्षेत्र विस्तारण्यास अजूनही खूप वाव आहे. नागरी सहकारी बँका देशाच्या विकासात दीर्घकाळ टिकणारे आणि सर्वांना योग्य न्याय देणारे योगदान देऊ शकतात. हत्तरगी मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी आशीर्वचन केले. व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सतीश घाळी यांनी बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

ते म्हणाले, बँकेच्या आजच्या समृद्धीत त्याग, परंपरा दडलेली आहे. बँकेच्या प्रत्येक आजी-माजी घटकाने दिलेल्या योगदानावर आज बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला. ४ फेब्रुवारी १९४२ रोजी एका बँकेवर सुरू झालेला आजचा विस्तार ३१ शाखा, तीन राज्यांपर्यत पोहचला आहे. बँकेच्या वाटचालीत भरीव योगदान देणारे माजी संचालक नानासाहेब नष्टे,  गणपतराव पाटील, राजेश पाटील- चंदूरकर, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, महादेव साखरे, डॉ. दिलीप चौगुले, अनिल सोलापुरे, राजेंद्र लकडे, चंद्रकांत स्वामी यांचा सत्कार चेअरमन सतीश घाळी यांनी केला. यावेळी विद्यमान संचालक राजेंद्र माळी, श्वेता हत्तरकी, राजशेखर येरटे, विद्या पाटील (चंदूरकर), प्रकाश दत्तवाडे, शशिकला निल्ले, रवींद्र बनछोडे, अलका स्वामी, संदीप नष्टे, श्रीशैल चौगुले, सिद्धांत पाटील- बुदिहाळकर, चेतन देसाई, रोहन लकडे, सुषमा तवटे, अभिजित सोलापुरे, गुरुदेव स्वामी, वरूण पाटील, शंकर मांगलेकर, सुरेश कोळकी यांचा सत्कार सभासदांच्या वतीने करण्यात आला. यावेळी राज्य सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुरेश कुराडे, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, गजानन सुलतानपुरे, सरलाताई पाटील, बँक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह बँकेचे आजी-माजी संचालक, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. उपाध्यक्ष वैभव सावर्डेकर यांनी आभार मानले. पसायदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes